जळगाव

जळगाव : महिलांची उज्वला गॅसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये महिलांकडून उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याच्या नावाखाली कागदपत्रांसह प्रत्येकी १५० रूपये असे एकूण १ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाप आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, आयोध्या नगर, गोपाळपुरा, आसोदा रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे रा. रामेश्वर कॉलनी, राहूल गणेश सपकाळे रा. सुप्रिम कॉलनी, विजय गंगाधार भोलाणे आणि किरण विजय भालाणे रा. बी.जे.मार्केट या चौघांनी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची बतावणी करीत तशा मजकुराचे बॅनर लावून स्टॉल लावण्यात आले. त्याठिकाणी महिलांकडून रेशनकार्ड, आधारकार्ड, कागदपत्रांची झेरॉक्स व फोटो घेऊन प्रत्येक महिलेकडून १५० रुपये जमा केले. एकूण 1 हजार २०० महिलांकडून ही रक्कम जमा करण्यात आली.

२९ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरपर्यंत या चौघांनी कागदपत्र आणि पैसे घेण्यास सुरूवात केली. अनेक दिवय झाल्यानंतर देखील गॅस कनेक्शन मिळाले नाही. तसेच याबाबत विचारणा केली परंतू चौघांकउून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.

SCROLL FOR NEXT