जळगाव

Lok sabha Election 2024 Results : जळगाव, रावेरमध्ये 17 हजार ‘नोटा’

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदानामध्ये दोन्ही लोकसभांमधील मतदारांनी 17,760 'नोटा' वापर केला. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील 38 उमेदवारांना 17,760 नोटा वापर करून नाकारण्यात आलेले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान हा सर्वांचा सर्वाधिक महत्त्वाचा अधिकार आहे. त्याचा वापर करून नागरिक आपले प्रतिनिधी केंद्रामध्ये पाठवित असतात. नुकत्याच 2024 च्या निवडणुकीमध्ये जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये जळगाव रावेर लोकसभेतील 38 उमेदवारांना 17,760 नोटा वापर करून मतदारांनी प्रतिनिधी म्हणून नाकारले आहे.

दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 17,760 इतक्या मोठ्या प्रमाणात 'नोटा' वापर झाल्यामुळे उमेदवार देताना त्याचे काही निकष असावेत असेही समोर येत आहे. सर्वाधिक 'नोटा' जळगाव येथे 13,699 इतका वापरला गेला, तर रावेरमध्ये 4,061 नोटा वापरला आहे.

SCROLL FOR NEXT