जळगाव

जळगाव जिल्ह्यात 16 लाखांच्या घरफोडी

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात चोरीचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. चोरट्यांनी फैजपूर, मेहुणबारे, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव आणि एरंडोल या पोलीस स्टेशन अंतर्गत विविध ठिकाणी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि शेतीचे साहित्य असे एकूण 16 लाख 60 हजार 900 रुपये घेऊन पसार झाले आहेत.

पोलीस प्रशासन एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत असतानाच चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देऊन टाकले आहे. पोलीस इकडे अंतर्गत किंवा हद्दपारचे प्रस्ताव करीत आहे तर दुसरीकडे चोरटे जिल्ह्यातील बंद घरांवर हात साफ करून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार होत आहेत.

या घटनेत यावल तालुक्यातील अकलूज येथील राजेश नरावते (जैन) यांच्या घरातून 11 लाख 07 हजार 900 रुपये, चाळीसगाव तालुक्यातील मादुर्णगाव येथील दगडू पाटील यांच्या घरातून 81 हजार रुपये, चाळीसगाव शहरातील अशोक भिमसिंग पाटील यांच्याकडून 81 हजार रुपये, चोपडा येथील राजाबाई मिस्तरी यांच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये, भडगाव तालुक्यातील वडजी येथील राजेंद्र कुमार जयराम माटे यांच्याकडून 1 लाख 34 हजार 700 रुपये आणि एरंडोल येथील शोभाबाई माणिक पाटील यांच्याकडून 48 हजार रुपये चोरी झाले आहेत. या सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT