जळगाव : भुसावळ येथील मरीमाता उत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवात सायंकाळी बारागाड्या ओढताना एकाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भुसावळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवसापासून भुसावळ येथील मरीमाता उत्सवाला प्रारंभ झाला. त्यात शनिवारी (दि.2) सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा प्रारंभ झाला.
यावेळी बारागाड्यांच्या खाली गिरीश रमेश कोल्हे (36, रा. जुना सातारा) सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या बारागाड्या अपघातांमध्ये छोटू कुंभार, धर्मराज कोळी, मुकेश पाटील, नितीन फेगडे हे जखमी झाले आहेत.