उत्तर महाराष्ट्र

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; येथील अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

धरणगाव शहरातील १३ वर्षीय मुलगी गुरुवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी चोपडा येथे आई-वडिलांसह आली होती. यावेळी संशयित दीपक हिरामण पाटील (रा. संजयनगर, धरणगाव) याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा बसस्थानकातून पळवून नेले. त्यानंतर गुजरातमध्ये आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT