चाळीसगाव भाजपचा डंका,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व खासदार उन्मेश पाटील यांचे मूळगाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे.

खासदार उन्मेश पाटील यांचे मुळगाव दरेगाव ता. चाळीसगाव या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार गिरीश पाटील यांनी राजेंद्र साबळे यांचा एकतर्फी पराभव करीत ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. वैशाली राठोड, बबन गायकवाड, जगदीश पाटील, रत्‍नाबाई पाटील हे भाजपचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्यपदी बहुमताने निवडून आले असून या अगोदर प्रकाश शिरसाठ व दुर्गाबाई माळी या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले आहे. त्यामुळे बहुमताने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT