उत्तर महाराष्ट्र

जळगाव : भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : पाचोरा वनपरिक्षेत्रातील कळमसरे परिसरात ४ वर्षीय बिबट विहिरीत पडून बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा बिबट शेतशिवारात भक्ष शोधार्थ आला असावा व विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जानेवारी २०२१ ते २०२२ या वर्षभराच्या कालावधीत एकापाठोपाठ सहा ते सात बिबटयांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. परंतु या बिबटांचा मृत्यू रोखण्यासाठी वा बिवट वा अन्य वन्य प्राणी भक्ष शोधार्थ शेत शिवार वा मनुष्य वसाहतीकडे येउ नयेत यासाठी वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढला असल्याचे दिसते आहे.

जिल्हयात जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा, जामनेर, मुक्ताईनगर वडोदा कुर्‍हा काकोडा असे विविध वनपरिक्षेत्र आहेत. तर यावल वनविभाग हा स्वतंत्र विभाग आहे. जळगाव उपवन संरक्षक विभागांतर्गत पाच ते सात विभागात हरीण, निलगाय, ससे, माकड, रानडुकर वा अन्य वन्य प्राण्याचा संचार आहे.

गेल्या वर्षी जानेवारी २०२१ च्या सुरूवातीस जळगाव ममुराबाद रस्त्यावर भक्ष व पाण्याच्या शोधार्थ आलेल्या दोन ते तीन वर्षीय बिबट देखिल दोन ते तीन दिवसात भक्ष न मिळाल्याने पोटात अन्नपदार्थ नसल्याने तसेच शेतातील चारीत असलेले रसायन खतमिश्रीत पाणी प्याल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज कानळदा पशु वैद्यकिय अधिकारी तसेच मानद वन्यप्राणी रक्षक विवेक देसाई यांनी वर्तविला होता. त्यानंतर चोरगाव शिवारात काम करीत असलेल्या महिलेल्या मृत बिबटयाचे शव आढळले होते.

३१ जानेवारी रोजी पाचोरा तालुक्यात कळमसरे येथे गट न. ५३३/१ दयाराम तुळशीराम चौधरी यांच्या शेतातील विहीरीत बिबट पडल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मृत बिबट अंदाजे ४ वषीय नर जातीचा असून आजूबाजूला झांडांवर माकडांची वसाहत असलेल्या ठिकाणी भक्ष शोधार्थ आलेले बिबट उडी मारतांना विहीरीत पडले असावे व बाहेर येण्यास मार्ग नसल्याने पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

हा बिबट दोन दिवसांपासून पडला असावा असा देखील अंदाज व्यक्त होत आहे. आतापर्यत जिल्हयात सहा ते सात बिबट मृत्यू झाले आहेत. हे सर्व बिबट भक्ष व अन्न पाण्याच्या शोधार्थ मानवी वसाहती व शेतशिवारात संचार वाढत असल्याचे दिसून येत आहे. या मृत बिबटचे शवविच्छेदन करण्यात येवून जळगाव उपवन संरक्षक विवेक होशिंग, एरंडोल आरएफओ दत्तात्रय लोंढे, नांद्रा पशुधन विस्तार अधिकारी बारी, वनरक्षक पी.बी.देवरे, पी.बी.सूर्यवंशी, जे.व्ही.ठाकरे, एल.एस.पाटील आदी अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत मृत बिबट वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT