उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘नवजीवन’च्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
वकिली व्यवसाय करताना केवळ अर्थार्जनाचा विचार न करता ध्येयवादी वकिली केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल, त्यासाठी नवजीवनच्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात इंटर्नशिपची संधी देणार असल्याचे प्रतिपादन सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील संग्रामसिंग भोसले यांनी केले.

नवजीवन विधी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या वतीने विश्वस्त सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 'वकिली व्यवसायातील विविध संधी व ट्रायल ते सुप्रीम कोर्ट' या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी अ‍ॅड. भोसले बोलत होते. व्यासपीठावर प्लेसमेंट सेलच्या समन्वयक तथा प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार उपस्थित होत्या. अ‍ॅड. भोसले म्हणाले की, कुठलाही व्यवसाय करताना त्यातील अडचणींचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक बाबीचा विचार करून वाटचाल केली पाहिजे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वकिली ध्येयवादी होती. त्यामुळे त्यांच्या वकिलीचा प्रभाव अनन्यसाधारण आहे. ट्रायल कोर्टाचा विचार करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करा, त्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना डिग्रीबरोबरच प्लेसमेंट दिली जात असून, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT