उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहरातील दुचाकीसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिस ठिकठिकाणच्या पाँईटवर कर्तव्य पार पडत असतांना दिसून येत आहेत. हेल्मेट न घातल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई आणि पाचशे रुपयांचा दंडही आकारण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककर आता हेल्मेट घाला आणि सुरक्षितता जपून दंड टाळा.

शहरात काही महिन्यांपासून नाशिकमध्ये हेल्मेट घालण्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु आता पुन्हा हेल्मेट सक्तीला सुरुवात झाल्याने गुरुवार, दि.1 डिसेंबरपासून हेल्मेट न वापरणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी  सांगितले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले असून जे सुज्ञ नाशिककर नियमितपणे हेल्मेट वापरतात ते दंडापासून वाचणार आहेत.

या वेळेत येथे होणार चेकींग ….

शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले असून नाशिक पोलिसांकडून शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर नियमितपणे चेकिंग होणार आहे. तर सकाळी 10 ते 12 तर सायंकाळी 5 ते 7 पर्यंत वाहनांची चेकिंग होऊन त्यानुसार वाहनधारकांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचे शहर पोलिस आयुक्तांकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT