उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.24)पासून नाशिक ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा ग्रंथोत्सव होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सकाळी 10 ला उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली. दोनदिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, कविसंमेलन, मान्यवरांची व्याख्याने, मनःशक्ती संगीत असे विविध कार्यक्रम ग्रंथप्रेमी व वाचक यांना अनुभवयास मिळणार आहे. तसेच विविध ग्रंथ व साहित्य प्रदर्शन व विक्री या दोन्ही दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. ग्रंथोत्सवास शहरातील नागरिक व ग्रंथप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन जोपूळ यांनी केले आहे.

असे आहेत कार्यक्रम…

ग्रंथदिंडी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 24) सकाळी 9 ला ग्रंथदिंडीचा प्रारंभ होणार आहे. ग्रंथदिंडीची सुरुवात सार्वजनिक वाचनालय टिळकपथ येथून रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ पॉइंट, चांदीचा गणपती, मेनरोड, मुंदडा मार्केटमार्गे सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न होणार आहे. ग्रंथदिंडीत शाळा, महाविद्यालये, अधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमी सहभागी होणार आहेत.

व्याख्यान : ग्रंथोत्सवस्थळी शुक्रवारी (दि. 25) वाचनसंस्कृती व ग्रंथांचे महत्त्व या विषयांवर डॉ. शंकर बोर्‍हाडे व डॉ. दिलीप धोंगडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारच्या सत्रात 2.30 ते 4.30या वेळेत गायक व संगीतकार संजय गिते यांचे व्यक्तिविकास, तणावमुक्तीसाठी मनशक्ती संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 5 ला समारोपास जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपसंचालक तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी उपस्थित राहणार आहेत.

कविसंमेलन : विजयकुमार मिठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.24) दुपारी 3 ते 4 यावेळेत ग्रंथोत्सवस्थळी निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT