देवळा ग्रामपंचायत निकाल ,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat : देवळा तालुक्यात तेरा पैकी बारा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

गणेश सोनवणे

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा 

देवळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

तालुक्यातील सार्वत्रिक तेरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८) मतदान झाले. यात फुलेनगर, वासोळ, भऊर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, डोंगरगाव, वाजगाव, कणकापुर, श्रीरामपूर, सटवाईवाडी, चिंचवे व दहिवड या गावांचा समावेश आहे.

आज मंगळवार (दि.20) देवळा तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती लागले असून सर्वांधिक तेरा पैकी 12 ग्रामपंचायतींवर भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. सर्व विजयी उमेदवार व पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT