उत्तर महाराष्ट्र

दिंडोरी नगरपंचायतीत सेना-भाजपात लढत

गणेश सोनवणे

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतिम मुदतीत दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात शिवसेनेच्या मेघा नितीन धिंदळे, तर भाजपच्या आशा भास्कर कराटे यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या उमेदवार आशा कराटे व पदाधिकारी.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या उमेदवार आशा कराटे व पदाधिकारी.

निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, भाजपचे चार व काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. पहिल्या अडीच वर्षांकरिता नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मुदतीत दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 14 फेब्रुवारी असून, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ला नगराध्यक्षपदाची निवडणूक होईल. दरम्यान शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र, भाजपने अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला असून, गटनेत्या अरुणा देशमुख यांनी भाजपचे नगरसेवक एकत्र असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीत उपनगराध्यक्षपद कुणाला दिले जाणार, याबाबत उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

SCROLL FOR NEXT