धुळे

कुलर ठरला जीवघेणा; कुलरचा शॉक लागल्याने २ तरुणांचा जागीच मृत्यू

Electric shock death | या दोनही घटनांमुळे शिरपूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : शिरपूर तालुक्यातील होळनाथे आणि भामपूर या दोन गावांमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडल्या असून कुलरचा शॉक लागल्याने २ युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होळनांथे येथील हर्षल विनोद मराठे हा युवक घरात बसून अभ्यास करत होता. दरम्यान त्याचा हात अचानक कुलरला लागला आणि त्याला जोराचा विजेचा शॉक बसला. शॉक इतका तीव्र होता की हर्षलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दुसरी घटना भामपूर येथे घडली. येथील महेश भरवाड हा युवक कुलर सुरू करत असताना त्याला विजेचा जबरदस्त शोक लागला. त्यात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात शोक कळा पसरली आहे. या दोनही घटनांमुळे शिरपूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घरातील विद्युत उपकरणे वापरताना अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विशेषतः उन्हाळाच्या काळात कुलर, पंखे, फ्रिज यांसारख्या उपकरणांचा वापर वाढत असल्याने सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रशासन आणि वीज विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी घरातील वायरिंग प्लग आणि उपकरणांची नियमित तपासणी करण्याचेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT