प्रातिनिधिक छायाचित्र  File Photo
धुळे

धुळे: देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

Dhule Crime News | स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. या दोघांचा इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. (Dhule Crime News)

धुळे शहरातील दोघा तरुणांकडे घातक शस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यानुसार देवपूर पोलीस ठाणे हद्दीत नगांवबारी परिसरात कांकरिया लॉन्स जवळ, प्रणव किशोर शिंदे (रा.विंचुर ता.जि.धुळे) हा दशहत माजविण्याच्या उद्देशाने त्याचे कंबरेस गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून फिरत होता. त्याच्या सोबत विनय देवानंद नेरकर (रा. फॉरेस्ट कॉलनी, नगांवबारी, धुळे) यांना ताब्यात घेतले. प्रणव शिंदे याच्या कंबरेला गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. तसेच विनय नेरकर याचे अंगझडतीत त्याच्या पँटच्या खिशात पिस्टलचे मॅगझीन व एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्याकडून एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील आरोपी प्रणव किशोर शिंदे याच्या विरुध्द पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी विनय देवानंद नेरकर याच्या विरुध्द देखील धुळ्यात अशाच प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अमरजीत मोरे, संजय पाटील , शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धमेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, हर्षल चौधरी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT