Gram Panchayat member disqualified
बोदगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे.  
धुळे

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणारे तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर (जि.धुळे) : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने साक्री तालुक्यातील बोदगाव ग्रामपंचायतीचे अनिता देविदास अहिरे, कल्पना सुरेश चव्हाण आणि काशिनाथ रामा पवार हे तीन सदस्य उर्वरित कालावधीसाठी अपात्र झाले आहेत. या तीन सदस्यांच्या विरोधात योगेश कांतीलाल ठाकरे (रा.बोदगाव) यांनी ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी यांनी (दि.24 जून 2024 रोजी दिलेल्या निकालात वरील तिन्ही सदस्यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे.

वनविभागाच्या जागेवर शेती

बोदगाव ग्रापंचायतीच्या सदस्यपदी अनिता अहिरे, कल्पना चव्हाण आणि काशिनाथ पवार हे 2022 च्या ग्रा.पं.निवडणुकीत निवडून आले होते. मात्र वरील तिनही सदस्य व त्यांचे कुटूंबातील सदस्यांनी वनविभागाच्या जागेचा शेतजमीन म्हणून वापर करीत होते. सदरची जागा शासनाच्या वनविभागाच्या मालकीची असताना सदर सदस्यांनी अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे योगेश कांतीलाल ठाकरे यांनी ऍड. लक्ष्मीकांत ठाकूर यांच्यामार्फत ग्रामपंचायत अधिनियमनाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केले होते. यासंदर्भात अंतिम युक्तीवादान्वये योगेश ठाकरे यांच्यातर्फे ऍड. लक्ष्मीकांत ठाकूर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून अनिता अहिरे, कल्पना चव्हाण, काशिनाथ पवार हे तिनही सदस्य उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत.

दि. 24 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय दिला आहे. अर्जदारामार्फत ऍड.लक्ष्मीकांत ठाकूर यांनी कामकाज पाहीले. त्यांना ऍड.चैतन्य एस.बर्गे, ऍड.निशा चाळसे, ऍड.मनिषा सोनवणे यांनी सहकार्य केले

SCROLL FOR NEXT