Crime (File Photo)
धुळे

Dhule crime | शिरपूरला मुलाकडूनच माता-पित्याची हत्या

शिरपूरला मुलाकडूनच माता-पित्याची हत्या

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पत्नी समोर आई-वडील अपमानजनक बोलतात, या किरकोळ कारणावरून मुलाने डोक्यात दगड घालून आपल्या जन्मदात्या माता-पित्याची हत्या केल्याची घटना शिरपूर शहरात घडली. विशेष म्हणजे या निर्देची मुलाने पायरीवरून पाय घसरून पडल्याने आई-वडील जखमी झाल्याची खोटी माहिती दिली. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहार राज्यातील ग्राम गोकुळ, जि. दरभंगा येथील मूळचा रहिवासी असलेला संशयित चंदनकुमार गंगा महातो (२५) हा रोजगाराच्या निमित्ताने शिरपूर शहरात वास्तव्यास आहे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असणारा चंदनकुमार याच्या समवेत त्याचे आई-वडील आणि पत्नीदेखील राहाते. शुक्रवारी (दि.१५) दुपारी २.३०च्या सुमारास चंदनकुमार याने त्याच्या काही मित्रांना आई-वडील जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात न्यायचे असल्याचे लांगून घरी बोलावले.

यावेळी त्याने मित्रांना आई-वडील पायरीवरून पाय पसरून पडल्याने जखमी झाल्याची माहिती दिली. मात्र, गंभीर जखमी झाल्याने गंगा महाती (५४) आणि रणजुदेवी महाती (४३) या दोघांचा मृत्यू इशाला होता. दरम्यान घटनास्थळ राहणाऱ्या एका नागरिकाला संशय आल्याने त्याने शिरपूर पोलिसांना ही माहिती कळविली, त्यामुळे शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चंदनकुमार याची चौकशी केली. पात त्याने आई आणि वडिलांचे आपसात भांडण झाले, यात दोघेही गंभीर जखमी झाल्याचा बनराव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT