धुळे

Dhule crime news | शिरपुर बसस्थानकात दोन गटांत हाणामारी; परिसरात खळबळ

स्थानकातील एका कर्मचाऱ्याला मारहाणीत दुखापत झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : शिरपुर बसस्थानकात प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून एकमेकांचे कपडे फाडून शिवीगाळ करत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिरपूर बस आगारात काही काळ तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बसची प्रतीक्षा करत असताना काही प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद काही क्षणाधार्त वाढत गेला आणि दोन गट एकमेकांवर तुटून पडले. यावेळी संतप्त प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडत लाथा बुक्यांनी जबरदस्त मारहाण केली. घटना दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्थानकातील कर्मचाऱ्याला मारहाणीत दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बसस्थानकात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT