धुळे

मैत्रेय ठेवीदारांचे पैसे परत करा : आ. कुणाल पाटील यांची मागणी

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्हयासह महाराष्ट्रातील असंख्य ठेवीदारांचे पैसे मैत्रेय गृप ऑफ कंपनीने पैसे बुडविले आहेत. ठेवीदारांचे परताव्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश समितीला द्यावेत अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत केली.

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. अधिवेशनात (दि. 13) धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धुळे जिल्हयासह राज्यातील मैत्रेय ठेवीदारांच्या झालेल्या फसवणूकीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, मैत्रेय गृप ऑफ कंपनीने राज्यातील सुमारे 2 कोटी 16 लक्ष नागरीकांचे एकूण 2600 कोटी रुपये बुडविले आहेत. सदर कंपनी सन 2009 पासून मैत्रेय गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच या कंपनीची कार्यालयेही बंद झाली आहेत. मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ पी.क्र.1361/18 दि.8 एप्रिल2019 अन्वये एमपीआयडी कायद्यानुसार ठेवीदारांना राज्य शासनाकडून परताव्याची रक्कम वितरीत करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. त्यामुळे सदर समितीला राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करणेसाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.आ.पाटील यांनी मैत्रेय ठेवीदारांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याबद्दल असंख्य ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT