पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य, आणि कै.एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात 14 सप्टेंबर हिंदी दिवसाचे आयोजन मोठया थाटात पार पडले. या कार्यक्रमाचे संयोजन हिंदी विभागाध्यक्ष प्रा. डॉ आनंद खरात यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वतीचे पूजनाने झाली.
संबधित बातम्या :
महाविद्यालयाची विद्यार्थीनी चेतना निकुंभ हिने हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी त्रिलोकजी गुप्ता यांनी आपल्या भाषणात हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. रोजगाराच्या संधी कुठे कुठे आहे याची सविस्तर चर्चा केली. चित्रपट क्षेत्र, अनुवाद क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात करिअर करायच्या अनेक संधी उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मी एरिया मॅनेजर असतांना अनेक राज्यात काम करण्याची संधी मिळाली परंतु माझी मातृभाषा हिंदी असल्याने मला एकमेकांना समजून घेण्यासाठी काहीही अडचण आली नाही. हिंदी ही जगात तीन नंबरची भाषा आहे. हिंदीचा साहित्य विस्तार खूप मोठा आहे. पंत प्रसाद, नीराला, हे हिंदीचे ब्रह्मा, विष्णू, आणि महेश आहेत. महादेवी वर्मा, दिनकर, उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य जगाच्या अनेक भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यामुळे हिंदी भाषा जन-जन की भाषा झाली आहे. तिचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे त्यांनी सांगतिले.
तर दुसरे मान्यवर विष्णू भोसले यांनी आपल्या खुमासदार शैलीत हिंदी कवितेच्या माध्यमातून अनेक ज्वलंत विषयावर भाष्य केले. युवा पिढीला त्यांनी हिंदी भाषेत अनेक मार्ग दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के.डी.कदम होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी दिवसाचे महत्त्व, तिचे आजचे स्थान काय आहे हे गणिती पध्दतीने विद्यार्थ्यांना सांगितले.
या प्रसंगी प्रा. के.आर.डॉ.एन बी सोनवणे, प्रा.बळसाने, प्रा.डॉ.खोडके, प्रा.डॉ तोरावणे, प्रा.एल.जे.गवळी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार हिंदी विभागाध्यक्ष विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.आनंद खरात यांनी केले.
हेही वाचा :