पिंपळनेर (जि. धुळे) : शहरात पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणूक होत असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिवसभर शांततेत मतदान पार पडले. काही केंद्रांवर किरकोळ वाद आणि दोन ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आली, पण ती दूर करून प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.
एकूण २३ मतदान केंद्रांवर अंदाजे ७१.९८ टक्के मतदान झाले. प्रभागनिहाय मतदानाचा तपशील असा...
प्रभाग १: १७७३ पैकी १३५६ मतदार (७६.४८%)
प्रभाग २: १८५३ पैकी १२४४ मतदार (६७.१३%)
प्रभाग ३: १७८२ पैकी १३५९ मतदार (७६.२६%)
प्रभाग ४: २४३८ पैकी १६४४ मतदार (६७.४३%)
प्रभाग ५: २१७१ पैकी १६६३ मतदार (७६.६०%)
प्रभाग ६: १८७९ पैकी १४५३ मतदार (७७.३२%)
प्रभाग ७: १५३८ पैकी १०३४ मतदार (६७.२३%)
प्रभाग ८: २३३० पैकी १७६५ मतदार (७५.७५%)
प्रभाग ९: १९९० पैकी १४५८ मतदार (७३.२६%)
प्रभाग १०: २५५२ पैकी १६४५ मतदार (६४.४५%)
निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.