पिंपळनेर,जि.धुळे : शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या आदेशावरून साक्रीच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या साक्रीतील कार्यालयावर शनिवार (दि.12) रोजी मध्यरात्री प्रहारने मशाल आंदोलन केले.
मशाल आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने साक्री प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेकडून साक्री येथील आमदार मंजुळा गावित यांच्या कार्यालयावर शनिवार (दि.12) रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या घोषणा देत हातात मशाल, गळ्यात निळे पटके व भगवा ध्वज हातात घेत आंदोलन करण्यात आले.
महायुती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करू असे जाहीरनाम्यात भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना आश्वासित केले होते. मात्र आता महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द देखील काढत नाहीत. राज्यात दिवसाला सात शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याचे अहवालावरुन समोर येत आहे.