पिंपळनेर:जि.धुळे पुढारी वृत्तसेवा- येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित शांताई खाजगी औदयोगीक प्रशिक्षण संस्थेतील हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पुर्ण केलेल्या विदयार्थ्यांची राज्य शासनाच्या आरोग्य विभागात निवड झाली. यात पवनसिंग जारवाल, रामधन सोनुने, भरत घुनावत यांची सार्वजनिक आरोग्य़ विभाग, गट-क सरळसेवा पदभरतीत यशस्वी निवड झाल्याने या यशाने सर्वसाधारण परीस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबासमवेत ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण संस्थेतील या विदयार्थ्यांची सरळसेवा पदभरतीत यशस्वी निवड झाल्याने विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, सचिव रुपेश बधान, प्राचार्य चेतन सोनवणे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.