निजामपूर जैताणेत धनगर समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  (छाया : अंबादास बेनुस्कर)
धुळे

पिंपळनेर : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी निजामपूरमध्ये रास्तारोको

मारेकऱ्यांना कठोर शिक्षेसह आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनकर्त्यांच्या संतप्त भावना व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे: साक्री तालुक्यातील जैताणे येथील आदिवासी तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. धनगर एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी निजामपूर जैताणेत धनगर समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजावर दि.21 रोजी हल्ला करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेवून कठोर शिक्षा करावीअशी मागणी धनगर समाजाने यावेळी केली. बसस्थानकापासून तर खुडाणे रस्त्यापर्यंत यावेळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाज नेते अशोक मुजगे, शैलेज आजगे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनात निजामपूर जैताणे येथील धनगर समाज, हटकर समाज आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. धनगर समाज महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे, ईश्वर न्याहळदे माजी सरपंच जैताणे, शैलेंद्र आजगे सरचिटणीस भाजपा धुळे, दशरथ शेलार भाजपा शहराध्यक्ष, रविंद्र न्याहळदे, आनंदा सोंजे, अध्यक्ष धनगर समाज जैताणेचे भुराजी पगारे, पोपट न्याहळदे, गोकुळ पगारे, सदस्य ग्रामपंचायत जैताणे, भिका फकिरा न्याहळदे, धाकू कडू न्याहळदे, रघुनाथ पेंढारे, ईश्वर पगारे, भूषण सूर्यवंशी, लहू बोरसे, भगवान भलकारे, केवबा न्याहळदे, कविता अशोक मुजगे, सरपंच ग्रामपंचायत जैताणे, राकेश भलकारे, विजय काटके, सागर बोरसे, भूषण सूर्यवंशी, विकेश बोरसे, मोतीलाल मोरे, नानाभाऊ पगारे, मगन व्यापारे, त्र्यंबक भलकारे, गोकुळ कँखरे, नितीन तराडे, गंगाराम शिरोळे, राकेश पगारे, पंडित बच्छाव, युवराज बोरसे, गुलाब न्याहळदे, ज्ञानेश्वर बच्छाव आदी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT