पिंपळनेर (जि. धुळे) : येथील श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 1 ऑगस्ट रोजी शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य बी.एम. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयश्री झगडे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती दिली, तर स्वाती गांगुर्डे यांनी शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य बी.एम. भामरे यांनी महान नेत्यांबाबतचे समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या समर्पित जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत एकूण 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत इयत्ता पहिलीतील कुश सारगोट (प्रथम), विराज जगताप (द्वितीय), प्रियल सोनवणे (तृतीय) इयत्ता दुसरीतील अनन्या सोनवणे (प्रथम), नालंदा भामरे (द्वितीय), हर्षिता शिंदे (तृतीय) इयत्ता तिसरीमध्ये रोहित गांगुर्डे (प्रथम), मानवि राठोड (द्वितीय), लावण्या साळुंखे व मनस्वी अहिरराव (संयुक्त तृतीय) तर इयत्ता चौथीतील तनु सारगोट (प्रथम), सुकन्या देवरे (द्वितीय), दिव्याची देशमुख (तृतीय) यांनी उत्कृष्ट वक्तृत्व केले. राजश्री बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून रोहिणी नेरे, जयश्री झगडे व अंजली बागुल यांनी काम पाहिले. पुनम देवरे यांनी आभार मानले.