पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतिलाल शनिवार्या अहिरे यांनी धुळे जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत बहुमोल योगदान दिले आहे. महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते कांतिलाल अहिरे यांचा सन्मान करण्यात आला
कांतिलाल अहिरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते त्यांना पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कांतीलाल शनिवार्या अहिरे यांनी पोलीस दलात तीस वर्ष सेवा केली असून मुंबई येथे पाच वर्ष, धुळे येथे 25 वर्ष त्यात आझाद नगर, धुळे शहर, एल.सी.बी.व सीआयडी, अनेक गुन्ह्यात आरोपींना शिक्षा तसेच उत्कृष्ट रायटर म्हणून काम केल्याबद्दल त्यानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात काम करीत असताना छावडी येथील एका आरोपीस 302 गुन्ह्यातील आरोपीस आजन्म करावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. त्यानंतर आता 2025 मध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षापासून उत्कृष्ट रायटर म्हणून आपली सेवा बजावत आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र दिनी धुळे येथे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कांतीलाल अहिरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पीएसआय भूषण शेवाळे, पीएसआय विजय चौरे, पीएसआय संसारे, पीएसआय शिरसाट आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.