Pimpalner Sakri
साक्री तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (छाया : अंबादास बेनुस्कर)
धुळे

पिंपळनेर : न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव साजरा

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे विद्यालयात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व्ही. ए.दहिते यांनी अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर मुख्याध्यापक एच. के. चौरे, एस. बी. राणे, एस. बी.अहीरे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. इ.आठवीच्या विद्यार्थिनींनी विठुरायाचे गीत गायन केले. आषाढी एकादशीचे महत्व विद्यालयाचे शिक्षक एस. जे. नगरकर यांनी मनोगतातून व्यक्त केले. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठलाच्या वेशभूषेत इयत्ता सहावीचा विद्यार्थी कल्पेश बिरारीस व रुक्मिणीच्या वेशभूषेत इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी मनस्वी मालपुरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. ए. दहीते व मुख्याध्यापक एच. के.चौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक के. आर कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT