‌Pimpalner Municipal Council  Pudhari News Network
धुळे

‌Pimpalner Municipal Council : मतदान कुठे करणार ? दुबार मतदारांना दिला अल्टिमेटम

14 नोव्हेंबरपर्यंत नगरपरिषदेत खुलासा सादर करण्याची मुदत,अन्यथा नोंद वगळण्याची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : अंबादास बेनुस्कर

येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वाची आणि अंतिम सूचना प्रसिद्ध केली आहे. प्रभाग याद्यांमध्ये दुबार नावे (एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी) असलेल्या मतदारांसाठी ही सूचना असून, प्रशासनाने त्यांना आपल्या मतदानाच्या जागेबाबत तातडीने खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. हा खुलासा 14 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे सांगण्यात आले आहे, दिलेल्या मुदतीत खुलासा केला नाही तर कारवाईस सामोरे जाण्यास तयार रहावे, असे देखील प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

458 दुबार मतदार

पिंपळनेर नगरपरिषदेच्या मतदार यादीत आढळून आले. अशा दुबार मतदारांची यादी नोटीस बोर्डवर नावाची यादी प्रसिद्ध देखील केली आहे.

निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग याद्यांमधील दुबार नावे असलेल्या 458 मतदारांची यादी पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये ज्या मतदारांची नावे समाविष्ट आहेत, त्यांनी तात्काळ नगरपरिषदेशी संपर्क साधून आपल्या नावाची तपासणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नोटीस बोर्डावर लावलेली दुबार मतदारांची यादी वाचविण्यासठी दिवसभर गर्दी दिसून आली.

14 नोव्हेंबरपर्यंत लेखी खुलासा अनिवार्य

संबंधित दुबार नावे असलेल्या मतदारांना नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, त्यांनी नेमके कोणत्या प्रभागात मतदान करणार आहात याचा लेखी खुलासा दि.14 नोव्हेंबरपर्यंत नगरपरिषदेत सादर करणे अनिवार्य आहे

जर संबंधित मतदारांनी दि. 14 नोव्हेंबरपर्यंत लेखी खुलासा सादर केला नाही तर त्यांचे 'काही म्हणणे नाही' असे समजून प्रशासनाकडून दुबार नावाबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. खुलासा न करणाऱ्या मतदारांची नोंद वगळली जाण्याची किंवा एका ठिकाणाहून नाव काढली जाण्याची शक्यता आहे.

मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुधारणा आणणे

पिंपळनेर नगरपरिषद प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक (Transparency) आणि विश्वसनीय (Reliable) करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.याचा मुख्य उद्देश हा आहे की, एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा दोनदा नोंदवले असल्यास,अशा नोंदी वगळून यादी अचूक करणे.

मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे

केवळ वैध आणि पात्र मतदारांनाच आपला मतदानाचा हक्क बजावता येईल, याची सुनिश्चिती करणे. दुबार मतदानाचा धोका टाळणे. निवडणूक प्रक्रियेची पवित्रता टिकवून ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

ही केवळ एक सामान्य सूचना नसून, मतदारांनी या सूचनेची गंभीर दखल (Serious Note) घेणे अपेक्षित आहे. वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आली असून प्रशासनाने मतदारांना निर्धारित वेळेत (Stipulated Time) आवश्यक कागदपत्रे आणि माहिती देऊन कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. वेळेत कार्यवाही न केल्यास प्रशासनाकडून नियमानुसार एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा दोन्हीकडील नावे वगळली जाऊ शकतात, असे दुबार मतदारांना कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT