पिंपळनेर,जि.धुळे : उडाणे ता.धुळे येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी फक्त सहा महिने बाकी असून उपसरपंच आशाबाई गमन शिंदे यांनी राजीनामा दिला आहे.
त्यांच्या जागी उपसरपंच म्हणून कमलाकर भटू शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी ग्रामसेवक विश्वास नवानकर, सरपंच नबाबाई रामदास पवार, सदस्य रामदास हालोर, सुरेखा हाके, आशाबाई शिंदे, सुनंदा हाके उपस्थित होते.
कमलाकर भटू शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे पोपट शिंदे, आधार हाके, गमन शिंदे, प्रा विजय पाटील, सुभाष शिंदे, नाना वाघ, रामदास पवार, कमलाकर शिंदें किशोर शिंदे, मोतीराम हालोर, रोहिदास हाके, आबा बागुल, संतोष शिंदे, जयदेव बागुल, प्रशांत शिंदे, ताराचंद हाळगीर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. गावातील विकास कामे करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच कमलाकर शिंदे यांनी दिले आहे.