साक्री बस स्थानकाच्या वाहनतळाचे कॉंक्रीटीकरणाचा प्रारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.तुळशिराम गावित यांच्या हस्ते करण्यात आला.  (छाया:अंबादास बेनुस्कर)
धुळे

पिंपळनेर : साक्री बस स्थानक वाहनतळाचे लोकार्पण

चालक आणी वाहक यांनी प्रवाशांची गैरसोय हाणार नाही याची काळजी घ्यावी - आ. मंजुळा गावित

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात एम.आय.डी.सी आणी राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने राज्यातील बस स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरण करण्यात येईल, अशी घोषणा तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत आणी एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी केली होती.

यावेळी साक्री, पिंपळनेर आणि धुळे येथील बस स्थानकाच्या वाहनतळाचे कॉंक्रीटीकरण करुन मिळावे म्हणून मागणी करण्यात आली होती. आ.मंजुळा गावित नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्याने साक्री बस स्थानकाच्या वाहनतळाचे कॉंक्रीटीकरणाचा प्रारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.तुळशिराम गावित यांच्या हस्ते करण्यात आला. अवघ्या दिड महिन्यात हे काम कृष्णा-वृंदावन कंस्ट्रक्शनचे शासकीय ठेकेदार प्रकाश पाटील यांनी पुर्ण केल्यानंता या कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे. साक्री बस स्थानक वाहनतळाचे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मंजुळा गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

माझ्या वाहन चालक-वाहक बंधुना मी विनंती करते की, त्यांनी प्रवाशांना चागल्या प्रकारची सेवा द्यावी आणी आपल्या काही अडी-अडचणी समस्या असल्यास माझ्याकडे सांगाव्यात त्या सोडविण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन आपल्या आगाराचे उत्पंन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.आपल्या आगाराला नविन बसेस मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
मंजुळा गावित, आमदार.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.तुळशिराम गावित होते. कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे, जि.प.सदस्य गोकुळदादा परदेशी, सागर गावित, पं.स.सदस्य राजधर देसले, अशोक मुजगे, भाजप अध्यक्ष संजय अहिराव, कविता क्षिरसागर, नगर परिषदेचे गजेंद्र भोसले, भाडणे सरपंच अजय सोनवणे, नगरसेवक राहुल भोसले, जोशीला पगारीया, एस.टी.संघटनेचे फरीद भैया, सचिन घाडे, कार्यशाळा अधिक्षक योगेश शिंगने, शिवसेना आघाडीचे गोविंद भाऊ, कमल मोहिते, सुरेश पारेराव तसेच प्रवासी संघटनेचे पदाधीकारी जितु नांद्रे, मुकुंद बोरसे, कुणाल शिरसाठ, बाळा शिंदे, उल्हास पाटील व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT