महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने चिकसे व पश्चिम पट्ट्यातील वार्सा परिसरात जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. (छाया:अंबादास बेनुस्कर)
धुळे

पिंपळनेर : पश्चिम पट्ट्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे वतीने चिकसे व पश्चिम पट्ट्यातील वार्सा परिसरात जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कैलास शिरसाठ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नवनाथ कोळपकर प्रकल्प संचालक आत्मा, दिनेश नांद्रे प्रकल्प समन्वयक कृषी विज्ञान केंद्र धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रक्षेत्र भेट व चर्चासत्रामध्ये चिकसे येथील शेतकरी दादाजी खैरनार यांची शेडनेट मधील भाजीपाला लागवड, वार्सा येथील धेड्या मन्या राऊत यांची चारसूत्री भात लागवड, बारीपाडा येथील वनसंवर्धन केंद्र, मियावाकी पद्धतीची वृक्ष लागवड अशा विविध प्रक्षेत्रांना भेटी देण्यात आल्या. चिकसे येथील चर्चासत्र दरम्यान विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलून पारंपारिक पिकांऐवजी फळपिके व भाजीपाला पिकांकडे वळले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वृद्धी होईल असे मत व्यक्त केले.

आधुनिक शेतीकडे वळा : पंकज पाटील

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध फळबाग लागवडीच्या योजनांमध्ये सहभागी करून घेऊन पिकाखालील क्षेत्र वाढविण्याच्या सूचना कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक दिनेश नांद्रे यांनी केळी पिक लागवडीविषयी मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण केले. कीटक शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक शेती पद्धती काढून आधुनिक शेती पद्धतीकडे वळण्याचे आवाहन केले. शेती पिकामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर याविषयी त्यांनी माहिती दिली.

कृषी विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी वार्सा येथे भातखाचरामध्ये उतरून भात लागवडीचा आनंद घेतला

जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. हितेंद्र सोनवणे प्रकल्प उपसंचालक आत्मा यांनी आत्मातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, चर्चासत्रे व अभ्यास दौरे याविषयी माहिती दिली. चिकसे येथील कार्यक्रम व प्रक्षेत्र भेटीनंतर कृषी विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी वार्सा येथे भातखाचरामध्ये उतरून भात लागवडीचा आनंद घेतला. बारीपाडा येथील प्रक्षेत्र भेट व चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र वनभूषण चैत्राम पवार यांचे समवेत सर्व अधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेतमालाचे मूल्यवर्धन करून त्याची मार्केटिंग व ब्रँडिंग कशी करता येईल याविषयी सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मळगाव वार्सा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

पश्चिम पट्ट्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वार्सा व चिकसे परिसरात प्रक्षेत्र भेट देण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी बापूसाहेब गावित, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, कृषी विज्ञान केंद्रचे कीटक शास्त्रज्ञ पंकज पाटील, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, शितलकुमार तवर तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा, वाल्मीक प्रकाश तालुका कृषी अधिकारी धुळे, संजय पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांचे समवेत धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. पिंपळनेर मंडळाचे कृषी अधिकारी तानाजी सदगीर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT