पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील शिवाजीनगर परिसरातील मेटा इंजिनियरींग कंपनी या सौर ऊर्जा कंपनीची 77 हजार 600 रूपये किमतीची कॉपर वायर चोरट्याने लंपास केली आहे.
मेटा इंजिनियरींग कंपनी (कावठे,ता. साक्री) भटु दत्तात्रय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.8 ते 9 सप्टेंबर या दरम्यान शिवाजीनगर परिसरातील मेटा इंजिनियरींग कंपनी या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालय परिसरातील तब्बल 77 हजार 600 रूपये किमतीची कॉपर वायर चोरट्याने लंपास केली आहे. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल मोरे हे करीत आहेत.