राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे file photo
धुळे

पक्ष, घर फोडणारी प्रवृत्ती बहिणींचे पैसेदेखील काढून घेऊ शकते: खासदार सुप्रिया सुळे

पुढारी वृत्तसेवा

धुळे : भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांनीच, पराभव झाल्यास लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकलेले पैसे परत काढण्याची भाषा केली आहे. यात आम्हाला काहीही खोटे बोलण्याची गरज नाही. घर आणि पक्ष फोडून चिन्ह हिसकावून घेणारे पैसे देखील काढून घेऊ शकतात, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतीला लागणाऱ्या वस्तूंवरील टॅक्स शून्यावर आणू असेही सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे महिला मेळाव्यासाठी आलेल्या खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राज्यातील सरकारने प्रत्येक नात्याला किंमत लावली आहे. लाडक्या बहिणीला 1500, तर लाडक्या भावाला पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली. त्यांचे मन मोठे असते, तर लाडक्या बहिणीला एक लाख रुपये दिले असते. तरीही 1500 रुपये दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. पण देताना उपकाराची भाषा करू नये असा सल्ला सुळे यांनी दिला. यावेळी शहर- जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, जितेंद्र मराठे, शकीला बक्ष आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT