दारू पिऊन त्रास देणाऱ्या काकाला पुतण्याने हात- पाय बांधून दरीत ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला File Photo
धुळे

दारू पिऊन त्रास देणाऱ्या काकाला हात- पाय बांधून ढकलले दरीत; पुतण्यासह मित्राला अटक

विसरवाडीतील घटना; स्थानिक गुन्हे शाखेने ४८ तासांत लावला छडा

पुढारी वृत्तसेवा

धुळे : दारु पिऊन कुटुंबियांना अश्लिल शिवीगाळ करत त्रास देणाऱ्या काकाचा पुतण्याने काटा काढल्याचा प्रकार विसरवाडीमध्ये उघडकीस आला. पुतण्याने मित्राच्या मदतीने काकाचे हात-पाय तोंड बांधून त्याला दरीत फेकून देत त्याचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना नागपूर-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात घडली. या प्रकरणाचा ४८ तासांत छडा लावत पोलिसांनी पुतण्यासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली.

सईद शहा चिराग शहा फकीर (वय २८, रा. संतोषी माता गल्ली, विसरवाडी जि. नंदुरबार) असे मृत काकांचे नाव असून याप्रकरणी पुतण्या अवेश सलीम शहा,( वय २४, व्यवसाय-दुचाकी मॅकेनिक, रा. इंदिरानगर , विसरवाडी) व त्याचा मित्र सोहेल ऊर्फ बबलु मुबारक शहा याला अटक करण्यात आली.

नागपूर-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात तोंडावर रुमाल व हात-पाय दोरीने बांधलेल्या स्थितीत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे फॉरेन्सीक, फिंगर ब्युरो, स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. भौगोलिक पुरावे प्राप्त करुन अनोळखी प्रेताची ओळख पटविण्यासाठी व अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, यांनी स्वतंत्र दोन पथके तयार करुन रवाना करण्यात आली.त्यानंतर हा मृतदेह सईद शहा याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करताना त्या ठिकाणी काळा रुमाल आढळून आला होता. मृताच्या पुतण्याला काळा रुमाल वापरण्याची सवय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मृत काका दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता. या रागातून त्याने काकाला दरीत फेकून देत त्याचा मित्राच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि अमित माळी, साक्री पोलीस ठाणेचे सपोनि जयेश खलाणे, सपोनि अनिल बागुल, स्थानिक गुन्हे शाखा येथील असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोहेकॉ सदेसिंग चव्हाण, पोहेकॉ. तुषार सुर्यवंशी, पोकॉ. योगेश जगताप, पोकॉ. सुनिल पाटील, साक्री पोलीस ठाणेचे असई. रामलाल अहिरे, पोहेकॉ. संजय शिरसाठ, पोहेकॉ. शातीलाल पाटील, पोहेकॉ. आनंद चव्हाण, पोकॉ. तुषार जाधव, पोकॉ. प्रमोद जाधव यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT