धुळे

Nandurbar News : गुटखा विक्रीला पुन्हा दणका; दोन वाहनांसह 53 लाखाचा साठा जप्त

गणेश सोनवणे

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा – गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी धडाकेबाज कारवाई करून शहादा तालुक्यात दोन ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे साठे जप्त केले. म्हसावद येथील कारवाईत सव्वा लाखाचा साठा आणि तीन लाखाचे वाहन तर शहादा येथील कारवाईत वाहनासह सुमारे 52 लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नूतन पोलीस अधीक्षक श्रवण कुमार यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सांभाळली तेव्हापासून गुटख्याची चोरटी वाहतुक करणारे आणि गुटखा विक्री करणारे यांच्यावर छापे मारून पकडण्याची कारवाई सातत्याने चालू असल्याने सध्या गुटखा व्यावसायिकांची पाचावर धारण बसली आहे. महिनाभरापासून सातत्याने गुटखा वाहतूक करणारे पकडले जात आहेत तसेच चोरून विक्री करणाऱ्यांवर छापेमारी देखील केली जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्यांतर्गत खेतिया ते शहादा गावाकडे जाणाऱ्या सुलतानपुर फाटया जवळ संशयस्पद अॅटो रिक्षा अडवण्यात आली. त्यावेळी केलेल्या तपासणीत त्यात ५१४८०/- रु. कि. केसर युक्त विमल पान – मसाल्याचे २६० पाऊच, ८५८०/- रु. कि. V-१ तंबाखुचे एकुण २६० पाऊच, २८२००/- रु. कि. विमल पान मसाल्याचे ६० खोके, १८००/- रु. क. V-१ तंबाखुचे एकुण ६० खोके, ८७१२/- रु.कि. किंग पॅक विमल पान मसाल्याचे ४४ पाऊच, ९६८/- रु.कि. V-१ तंबाखुचे एकुण ४४ प्लॉस्टीकचे पाऊच आढळून आले. ३,००,०००/- रु. कि.च्या बजाज मॅक्झमा कपंनीची काळया व पिवळया रंगाची MH- १८ BG- १४८४ अॅटो रिक्षारिक्षासह हा सर्व साठा जप्त करण्यात आला. अन्सारी फैजान सिराज अहमद वय- २३ रा. जनता सोसायटी मार्केट रोड घर क्र. ७९ कबीरगंज धुळे ता. जि. धुळे याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई राकेश पांडुरंग पावरा अधिक तपास करीत आहेत.

दुसरी कारवाई शहादा दोंडाईचा बायपास रोडवर बालाजी रेसीडेन्सी समोर रोडवर शहादा येथे करण्यात आली. औषध साठा वाहून येणाऱ्या दहा चाकी ट्रक मधून औषधांच्या खोक्यात बेमालूनपणे वाहून नेला जाणारा तंबाखू साठा जप्त करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तपासणीत १६ लाख ४५ हजार रु. किमतीचे एकुसा १०८ हुक्का तंम्बाखु असलेले ७००० डब्बे, ८ लाख ८७ हजार ४०/- रु.कि. EIGAL HUKKAH SHISHA TABACCO नावाचे १३८६ पाऊच, ६ लाख ५६ हजार /- रु. कि. HOLA HUKKAH SHISHA TABACCO चे ४००० पाऊच, ५ लाख ४५ हजार ६००/- रु. कि. EIGAL HUKKAH SHISHA TABACCO ३५२ प्लॉस्टीकच्या पिशव्या लपवलेल्या आढळून आल्या. १५, लाख रु. किमती च्या टाटा कंपनीची १० चाकी वाहन क्र. आर. जे. २१ जी. सी. ३७९४ सह जप्त करून प्रतिबंधित अन्न पदार्थाचे महा. राज्यात विक्री करण्यासाठी विना चलान मानवी आरोग्यास अपायकारक आहे अशा असुरक्षित अन्न पदार्थ वाहतुक करीत असल्याचे आरोपाखाली श्रवणराम बिरदाराम वय- ३३ रा. रायधनु (शिवपुरा) ता. नागोर राज्य राजस्थान याच्या विरोध याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT