arrested
अटक Jail File Photo
धुळे

Dhule News | शेतकऱ्याची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सावकाराला अटक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिरपूर येथील शेतकऱ्यांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अवैध सावकार संदिप राजपूत यास आर्थिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने अटक केली आहे.

शिरपूर येथील रहिवासी असलेले अजितसिंग नवनीतसिंग राजपूत यांनी कंपवाताच्या आजाराच्या उपचारासाठी शिरपूर शहरातील अवैध सावकार संदीप प्रेमसिंग जमादार (राजपूत) याचे कडून मार्च 2017 मध्ये 30 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबाबत आपसात समजूतीचा लेख करुन घेतला होता. सदर 30 लाख रुपयांचे मोबदल्यात अजित सिंग राजपूत यांनी 90 लाख 53 हजार रुपये किंमतीची तक्रारदार यांची शिरपूर शिवारातील शेती नावे करुन देखील सदर शेती सोडविण्यासाठी जमादार यास वेळोवेळी 1 कोटी 21 लाख 6 हजार रुपये रोख दिले.

याशिवाय वेळोवेळी 16 लाख 64 हजार 200 रुपये रोख स्वरुपात पुन्हा दिले. उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात शेत देऊन देखील त्यास व्याजासहित आज पावेतो एकूण 1 कोटी 37 लाख 70 लाख 200 रुपये संदीप प्रेमसिंग जमादार (राजपूत) यास रोख स्वरुपात परत करुन देखील तो अजूनही तक्रारदाराकडे पैशांची मागणी करीत आहे.

पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या मुलाला शिरपूर मध्ये जिवंत राहू देणार नाही. अशी धमकी देतो. मी त्याचे कडे हिशोब समजवण्यासाठी गेलो तर शिवीगाळ करतो. धमकी देवून शाररिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक करीत आहे.
अजितसिंग नवनीतसिंग राजपूत, शिरपूर, धुळे.

त्याने अद्यापही तक्रारदार याची शेती परत न करता आर्थिक फसवणूक केली आहे. अशी तक्रार करण्यात आली त्यानुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशन मधे भारतीय न्याय संहिता 2023 कलम- 316(2), 318(4), 336(2)(3), 338, 340(2), 351(2)(3), 352, सह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.संदीप प्रेमसिंग राजपूत याची सावकारी व्यवसायाबददल माहिती घेतली असता त्याचे कडे सावकारी व्यवसायाबाबतचे कोणतेही अधिकृत लायसन नसून त्याने तक्रारदारास यापूर्वी दाखवलेले सावकारीचे लायसन हे बनावट असल्याचे समजले आहे. तो शिरपूर शहरात अवैधरित्या सावकारी व्यवसाय असून संदीप राजपूत याने तक्रारदार याचेसह इतर 4 ते 5 शेतकऱ्यांची तसेच शिरपूर शहरातील व आजूबाजूचे परिसरातील बऱ्याच लोकांना व्याजाने पैसे देवून त्यांची शेती, जमीन, प्लॉट स्वतःच्या नावे व इतरांच्या नावे करुन घेतली आहे. जमादार यास अटक करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT