धुळे

धुळे : रूनमळी येथे ग्रामसेवक, सरपंच उपसरपंचाकडून ७५ लाखांचा उपहार

दिनेश चोरगे

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील रूनमळी ग्रामपंचायतीला मिळालेल्या विविध शासकीय योजनांचा निधी शिरपूर ग्रामपंचायत मधील निलंबीत ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंचाने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आर्थिक गैरव्यवहारात ७५ लाख ८८ हजार ७८२ रूपयांचा अपहार करण्यात आला आहे.

साक्री पंचायत समिती मधील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जगदीश पांडुरंग खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरपूर पंचायत समितीमधील निलंबीत ग्रामसेवक सी.पी.गायकवाड, रूनमळी ग्रा.पं. सरपंच सीताबाई दामू माळचे, उपसरपंच सिमाबाई अनिल पवार यांनी संगणमत करून सन २०१८ ते २०२३ कालावधीत ग्रामपंचायतीला मिळालेला निधी व उत्पन्न वेळावेळी बँकेतून काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. यात लेखापरिक्षण अहवालावरून ३ लाख ५० हजार, १५ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत १४ लाख १३ हजार ७ रूपये, पैसा ग्राम कोष समिती निधी मधील १४ लाख ८० हजार ३८०, ग्रामनिधी चे ४७ लाख १८ हजार ८७४ रूपये तर स्वच्छ भारत मिशनचे १८ लाख ५२ हजार असा एकूण ७५ लाख ८८ हजार ७८२ रूपयांचा अपहार उघड केल्याचे निष्पन्न झाले. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एच.एल. गायकवाड करीत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT