पिंपळनेर, जि. धुळे : शिव व्याख्याते प्रा. प्रशांत दत्तात्रय कोतकर, जेष्ठ समाजसेवक प्रकाश रामदास विसपुते व सामाजिक कार्यकर्ते महम्मदीभाई शब्बीर पिंपळनेरवाला यांना सन 2025 चा कर्म.बंडू बापूजी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व एम.व्ही.मराठे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ऍड उत्तमराव मराठे,भूपाल देशमुख,मा उपसभापती रवींद्र ठाकरे, संचालक सुदाम शेळके,प्रमोद पाटील,सुधाकर बागुल, हिराबाई जाधव पाटील, सरोज सोनवणे,जयेश मराठे, पी.जी.पाटील,गुलाब गांगुर्डे, नारायण भदाणे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे,वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एस.गीते,केंद्रप्रमुख मुकेश बाविस्कर, हेमलता पाटील, वासंती पवार,नितीन देसले, विजय पवार, रंजीता धिवरे, एस.एस.भामरे,इंद्रजीत देशमुख,आशिष विसपुते, कुणाल मराठे,यजुर्वेद मराठे, मृणालिनी मराठे उपस्थित होते. सन्मान पत्रांचे वाटप जे. एस.मराठे व प्रा.त्रिशीला साळवे यांनी केले. याप्रसंगी ऍड उत्तमराव मराठे व प्रा. प्रशांत कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमांतर्गत वनौषधी वनस्पती प्रदर्शन सोहळा, कडधान्य व भाजीपाला रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थिनींनी कडधान्य वापरू रांगोळी साकारली. या स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी बाल आनंद मेळावा पार पडला. वार्षिक पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्य सुधामती गांगुर्डे यांनी केले. अध्यक्षस्थानी सुदाम शेळके होते. सपोनी किरण बर्गे,सहाय्यक उपनिरीक्षक भूषण शेवाळे व विजय चौरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.सतीश पाटील, प्राचार्य संगीता पवार यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता पवार यांनी केले. सूत्रसंचालन जे. एन.मराठी व महेश मराठे यांनी मानले.