पिंपळनेर,जि.धुळे: भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी पिंपळनेर शहर तर्फे सोमवार (दि.14) रोजी सायंकाळी 7 वा मेनरोड पिंपळनेर येथे डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, मोतीलाल पोतदार, प्रमोद गांगुर्डे, योगेश नेरकर, युवा मोर्चा मंडळाचे पंकज भावसार, नितीन कोतकर, मडंल सरचिटणीस प्रतीक कोतकर, सुरेश बागुल, सुभाष नेरकर, श्याम पगारे, शेखर बाविस्कर, अनिल जाधव, प्रकाश अहिरराव, दौलत महाले, प्रशांत कोतकर, प्रशांत गांगुर्डे, अमोल पाटील, विकास ढोले, रवींद्र कोतकर, जगदीश धामणे, धनराज सोनवणे, संजय भिलाने, योगेश वाघ, भूषण एखंडे, योगेश कोठावदे, योगेश गांगुर्डे, घनश्याम सूर्यवंशी, प्रवीण गांगुर्डे, भाऊसाहेब एखंडे, कल्पेश नेरकर, प्रदीप चव्हाण, दीपक गांगुर्डे, उजेक पवार, सुधीर चव्हाण, राजू जगताप, रामकृष्ण सोनवणे, रविंद्र भावसार, कैलास गांगुर्डे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.