धुळे : शेती करत असताना होणारे अपघात, नैसर्गिक आपत्ती, रस्ते किंवा वाहन अपघात, विषबाधा यांसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व येत असल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 99 शेतकरी कुटुंबांच्या वारसांना एकूण 1 कोटी 95 लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
135 प्रकरणांपैकी 99 अर्जांना मंजुरी मिळाली असून सन 2024-25 या वर्षात धुळे जिल्ह्यात एकूण 135 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यामध्ये...
धुळे तालुका: 56 प्रस्ताव
साक्री तालुका: 23 प्रस्ताव
शिरपूर तालुका: 23 प्रस्ताव
शिंदखेडा तालुका: 33 प्रस्ताव
त्यातील 96 प्रकरणे मृत्यू संदर्भातील तर 3 अपंगत्वाची होती. त्यापैकी 99 अर्जांना मंजुरी देण्यात आली, 7 अर्ज नामंजूर करण्यात आले, 22 अर्ज अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित आहेत आणि 7 प्रकरणे तालुका समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांचे आई-वडील, पत्नी व पती, मुले किंवा अविवाहित मुलगी (वयोगट 10 ते 75 वर्षांपर्यंत) यांपैकी कोणताही एक सदस्य पात्र असतो.
अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व (दोन्ही डोळे,हात, पाय निकामी): 2 लाख रुपये
एक डोळा, हात, पाय निकामी: 1 लाख रुपये
अपघाताच्या 30 दिवसांच्या आत अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक असते.
रस्ता किंवा रेल्वे अपघात, विषबाधा, विजेचा शॉक किंवा वीज पडून मृत्यू, जनावरांचा हल्ला, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, दंगल किंवा खून, योजना लागू नसलेली प्रकरणे, नैसर्गिक मृत्यू, जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणे, कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली अपघात, मोटारशर्यतीमधील अपघात, भ्रमिष्टपणा, अंतर्गत रक्तस्राव, जवळच्या व्यक्तीने केलेला खून या कारणांमुळे मदत मिळू शकते
विहीत नमुन्यातील अर्ज
7/12 उतारा
मृत्यू प्रमाणपत्र
वारस नोंद (गाव नमुना 6)
वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र)
प्रथम माहिती अहवाल (FIR), स्थळ पंचनामा
पोलीस पाटील यांचा अहवाल
अपघातासंबंधित सर्व पुरावे व कागदपत्रे
संबंधित शेतकरी किंवा वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो. अर्ज प्रक्रियेसाठी कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी मार्गदर्शन करतात.