nutritional food packets
पांझरा नदीपात्रात पोषण आहाराची रीकामी पाकीटे आढळली pudhari news network
धुळे

Dhule News |धुळ्यामध्ये पांझरा नदीपात्रात आढळली पोषण आहाराची रीकामी पाकीटे

अंजली राऊत

धुळे : ऑनलाइन डेस्क - येथील पांझरा नदी ही तापी नदीची उपनदी असून पांझरा नदीपात्रात पोषण आहाराची एक गठ्ठा रीकामी पाकीट आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • धुळ्यात पांझरा नदीपात्रात रीकामी पोषण आहाराची पाकीटे आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • पोषण आहाराची विल्हेवाट लावून रिकामी पाकीटे नदीपात्रात फेकून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहार पाकीटाची अशाप्रकारे दशा दिसून येत आहे. शेकडोच्या संख्येने पोषण आहाराची रिकामी पाकिटे नदी पात्रात आढळली आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकीट आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

SCROLL FOR NEXT