श्रावणामुळे आमळीतील कन्हैयालाल महाराज मंदिरात दर्शन  
धुळे

Shravan | आमळीतील कन्हैयालाल महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

Kanhaiyalal Maharaj Temple | मंदिराचा परिसर हिरवाईने नटला

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर, जि.धुळे पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील दहिवेलपासून विस व कोडाईबारीपासून 13 किलोमीटर अंतरावर आमळी येथे कन्हैयालाल महाराज यांचे मंदिर आहे. श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते आहे. अनेक जण या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत आहे. तसेच मंदिरात सत्यनारायण पूजा व महाप्रसाद वाटप होते आहे.

काही दिवसांपासून आमळी येथील कन्हैयालाल मंदिराचा परिसर हिरवाईने नटला आहे. मंदिरातील कन्हैयालाल महाराज यांची मूर्ती विष्णूचे प्रतीक मानली जाते. या मूर्तीच्या बेंबीतून नेहमी पाणी पाझरत असते. ही सिंहासनावर निद्रावस्थेत असून, काळ्या पाषाणाची शेषशाही मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात मालनगाव व काबऱ्याखडक धरणासह लहान-मोठे धबधबे आहे. तसेच आमळीपासून दीड किलोमीटरवर अलालदरीचा धबधबा आहे. श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते आहे. या मंदिराच्या परिसरात लहान-मोती 19 मंदिर आहे. मंदिराच्या एका खिडकीतून सूर्यकिरणे बेट मूर्तीवर पडतात. मंदिरात कार्तिक एकादशीला दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेत गुजरात व मध्य प्रदेशसह अन्य भागातून भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची काही दिवसांपासून गर्दी होते आहे. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येत आहे.

कसे जावे मंदिरात

महामार्गावरील साक्री ते नवापूर रस्त्यावर कोडाईबारी रस्त्यावरून आमळीकडे येणारा फाटा आहे. महामार्गापासून ठेव किलोमीटर अंतरावर आमळी गाव आहे पिंपळनेरकडूनही आमळीला जाण्यासाठी रस्ता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT