murder file photo
धुळे

Domestic Violence: दारुच्या नशेत पतीने केला पत्नीचा खून

दारुच्या नशेत पतीने पत्नीचा खून: पतीला अटक

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील धामंधर, पोस्ट शेवगे येथील झिंगूबाई धाकलू गायकवाड (वय ३९) हीस पती धाकलू गायकवाड याने शनिवारी (दि. ६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत घरातील किरकोळ वादावरून लोखंडी ईळीत असलेल्या लाकडी काठीने डोक्यात खून केला. पिंपळनेर पोलिसात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीला ताब्यात घेत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

धामंधर येथे घरगुती वादातून दारुच्या नशेत पतीने पत्नीचा खुन केला असून पतीस अटक करण्यात आली आहे.

पती धाकलू चुनिलाल गायकवाड हा दारूच्या नशेत असताना झिंगूबाई व पती धाकलू यांचे भांडण झाले होते. झिंगूबाई ही पतीस शिवीगाळ करीत होती,त्याचा पतीला राग आल्याने जवळच पडलेली लोखंडी ईळीत असलेली लाकडी काठीने डोक्यात मारुन मारहाण केली,तरीही पत्नी पतीचे ऐकून घेत नव्हती यामुळे घरात पडलेली चार्जिंगची बॅटरी उचलून पतीने झिंगूबाई हिच्या डोक्यात मारल्याने ती जमिनीवर पडली. त्यानंतर पतीही घरातील पुढच्या खोलीत झोपी गेला. सकाळी उठल्यावर पत्नी झिंगूबाई हिस उठविण्याचा प्रयत्न केला,परंतु ती उठली नाही,म्हणून पतीने घाबरून तिचे अंगावरील सर्व कपडे बदलले.घटनेची माहिती मिळताच पोलिस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी झिंगूबाई गायकवाड हिस तेथील लोकांचे मदतीने पिंपळनेर ग्रामिण रुग्णालय येथे आणले व तेथील डॉक्टरांनी झिंगूबाई गायकवाड हिस तपासून मृत घोषित केले.यामुळे पोलिसात भाऊ चंदू जगताप यांच्या फिर्यादीवरून पती धाकलू गायकवाड यास पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT