पिंपळनेर, ( धुळे ) : धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवार (दि.18) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व जिल्हा ज्युडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राजे छत्रपती इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली असून शाळेच्या 11 खेळाडूंची विभागीय ज्युडो स्पर्धेत निवड झाली आहे.
निवड झालेले विद्यार्थी असे...
भाग्यश्री जगताप, मयूर ठाकरे, हिना भोई, राणी चौधरी, मुरलीधर जगताप, दर्शन देवरे, अजय गावडे, रोहित बापू माळी, संकेत पाटील, तुषार खैरनार आणि सुरज पाटील या 11 खेळाडूंची विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मृणाली अहिरे, पुनम सुळ, जयपाल गिरासे, रोहित बोरसे, सुधांशू पाटील, जयेश देवरे, सुरज पाटील, कार्तिकेश दहिते व अर्णव कुवर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
संस्थेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव, उपाध्यक्ष श्याम कोठावदे, सचिव रा.ना. पाटील सर, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, स्वप्निल बोधे यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना अहिरराव, अमोल अहिरे, बाळासाहेब गायकवाड, सुनील बहिरम व भोई यांचे मार्गदर्शन लाभले.