धुळे : ग्रामीणमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. रात्री अवकाळीसह वादळी वार्याने रब्बीतील मका, ज्वारी, बाजरी आदी पिके भुईसपाट केलीत. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे संबंधित अधिकार्यांना निर्देश आमदार राम भदाणे यांनी दिले आहेत.
यावर्षी रब्बीचा हंगाम चांगला फुलला आहे. बहुतेक पिके काढणीस आलेली आहेत. मजुरांअभावी काढणीचा हंगाम लांबलेला आहे. याचा फटका शेतकर्यांना बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. काल अवकाळी पाऊस आणि वादळी वार्याने मोठा कहर केला. रात्री एक ते दीड तास वादळी वारे सुरु होते. यामुळे ज्वारी, बाजरी, मका आदी पिके भुईसपाट झाली आहेत. हरभर्यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामाच्या ऐन काढणीवेळी सातत्यपुर्ण पाऊस झाला होता. आता रब्बीच्या काढणीला अवकाळीचा आणि वादळी वार्यांचा जोरदार फटका बसला आहे. प्रत्येक शिवारात मोठे नुकसान झालेले आहे. शेतकर्यांचे अश्रुही अनावर झाले आहेत. आमदार राम भदाणे यांची पाहणी आमदार राम भदाणे यांनी सांगितले, अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यांमुळे रब्बीचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याजवळ नुकसानीचे वास्तव मांडले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार राम भदाणे थेट धुळे ग्रामीणमधील शेतीशिवारात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसिलदार अरूण शेवाळे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, विद्याधर पाटील, मारुती पाटील, सखाराम पाटील, भाऊसाहेब देसले, देवेंद्र पाटील, प्रवीण पवार, श्रीराम पाटील, रावसाहेब पाटील, रजनीकांत पाटील, शरद निंबाळकर, दिनेश पाटील, धर्मेश पाटील, अनिल गवळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते.