पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धां शासकीय आश्रमशाळा शेवगे येथे संपन्न झाल्या. या झालेल्या क्रीडा स्पर्धेत अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील विद्यार्थ्यांनी 19 वर्षीय मुले गटात कबड्डी व 19 वर्षीय खो-खो तर 14 वर्षीय मुले कबड्डी गटात संघ विजयी ठरले.तर वैयक्तिक खेळ प्रकारात 15 मुले व चार मुली असे मिळून एकूण 66 विद्यार्थ्यांची प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धे करीता निवड झाली आहे.
या विजयी क्रीडा स्पर्धक खेळाडूंना शाळेतील मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप,प्राचार्य झेड.एम.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रशिक्षक एम.डी.माळी, बी.आर.पारधी, जी.बी.पवार, एस.एम.मोहिते यांनी खेळाडूंचा सराव करून घेत. घवघवीत यश संपादन केले सदर स्पर्धे करीता शाळेतील प्रा.गणेश भावसार, प्रा.विजय ठाकरे, प्रा.प्रविण पगारे व शिक्षक शरद सुर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. या बद्दल महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर संस्थेचे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे, सचिव पुष्पलता पगारे, संचालक व्ही.एन.जिरेपाटील, विजयराव सोनवणे, विठ्ठलराव पगारे, स्वप्निल पगारे, छायाताई पगारे मिलिंद महाजन यांनी यशस्वी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले.