accident file photo
धुळे

Dhule accident | धुळे-शिरपूर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात; एका महिलेसह युवकाचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : धुळे-शिरपुर राष्ट्रीय महामार्गावर शिरपुर जवळील हॉटेल RK जवळ भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर वाहनाने समोरून जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात मनिषा राजेंद्र पाटील आणि बंटी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याहून मध्यप्रदेशकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयसर वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षेला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला. मृतक रस्त्यावर चिरडले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रिक्षातून बाहेर काढले आणि त्यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तसेच काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT