धुळे

Dhule accident | धुळे-शिरपूर महामार्गावरील सोनगीर फाट्यावर भीषण अपघात

नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरची सहा वाहनांना धडक; ३ दुचाकी चक्काचूर, ३ जण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : रविवारी (दि.१२) दुपारी २ वाजेच्या सुमारास सोनगीर फाट्यावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या रसायन भरलेल्या युपी पार्सिंग असलेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या टँकरने उड्डाणपुलाखालील वाहने आणि दुकाने चिरडून मोठे नुकसान झाले आहे.

पुलाखालील शीतपेय विक्री केंद्राला टँकरने जोरदार धडक दिली. तिथेच उभा असलेला मका भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीलाही टँकरने जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात थरकाप वाढला आहे. एकूण ४ दुचाकी आणि १ कार अशा ६ वाहनांना या टँकरने चिरडले. या भीषण धडकेत ३ दुचाकी टँकरखाली आल्याने त्यांचा चक्काचूर झाला. ट्रॅक्टर, कार आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात ३ जण गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे आणि बागुल यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने एकमेकांत अडकलेली वाहने बाजूला काढून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे.

फक्त एकतर्फी उड्डाणपूल असल्यामुळे सोनगीर फाट्यावर अशा घटना वारंवार घडत आल्या आहेत. नंदुरबार, दोंडाईचा कडे जाण्यासाठी आणि नंदुरबार, दोंडाईचा कडून येणाऱ्या वाहनांना धुळे कडे जाण्यासाठी फाट्यावरील उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडावा लागतो. म्हणून क्रॉसिंग करताना शिरपूर कडून येणाऱ्या भरधाव वाहनांना सामोरे जावे लागते. फक्त धुळेकडूक शिरपूर दिशेने जात असतानाच उड्डाणपूल उभारण्यात आला आहे आणि शिरपूर हून धुळे कडे जाणाऱ्या वाहनासाठी उड्डाणपूल नसल्यामुळे फक्त एकतर्फी उड्डाणपूल असल्यामुळे सोनगीर फाट्यावर अशा प्रकारच्या घटना घडत असतात प्रशासन मात्र यावर दुर्लक्ष करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT