Dhule Sand transport bribe case Pudhari
धुळे

Dhule Bribe | वाळू वाहतुकीसाठी तहसीलदारांच्या नावाने लाचेची मागणी; दोघांना रंगेहाथ पकडले

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Dhule Sand transport bribe case

सोनगीर (धुळे) : धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर येथे तहसीलदारांच्या नावाने लाच मागणाऱ्या दोन जणांपैकी जितेंद्र राजेंद्र पाटील याला पंचा समक्ष पकडण्यात आले. या प्रकरणात रामराव हरचंद पाटील याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तक्रारदाराचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून पांजरा नदीतून वाळू वाहतूक करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे प्रत्येक ट्रॅक्टर २५ हजार रुपये अशा दोन ट्रॅक्टर साठी एकूण ५० हजार रुपयांची लाच तहसीलदारांच्या नावाने मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करून धुळे ACB पथकाने सापळा रचला. त्यानुसार अमळनेर येथे जितेंद्र पाटील याला २५ हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले. या कारवाई दरम्यान पंच साक्षीदार उपस्थित होते. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दुसरा आरोपी रामराव पाटील याचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. सदर कारवाई ACB धुळे चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT