पल्लवी बहिरम, अरुण चौरे Pudhari
धुळे

Dhule lovers Death | साक्री तालुक्यात डोंगरावर गळफास घेऊन प्रेमी युगुलाने जीवन संपविले

आदिवासी पश्चिम पट्यातील शेंदवड-मोहगावजवळील शिवाऱ्या डोंगरावर प्रेमी युगुलाने झाडाला घेतला गळफास

पुढारी वृत्तसेवा

Lover Couple Ends Life Dhule Sakri

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील शेंदवड-मोहगावजवळील शिवाऱ्या डोंगरावर झाडाला गळफास घेत प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. दोघेही रात्री घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता डोंगरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पश्चिम पट्टधात खळबळ उडाली आहे.

पल्लवी अभिमान बहिरम (वय १८, रा. वडपाडा-शेंदवड) आणि अरुण जेजिराम चौरे (वय २३, रा. मोहगाव शेंदवड) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वेगवेगळ्या पाड्यांवर राहत होते. दोघांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी ही साक्री तालुक्यातील वरपाडा येथे आई-वडिलांसोबत राहत होती. रात्री ती घरातून लक्षात आले. त्याच सुमारास अरुण हा देखील जेवण करून कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडला. दोघेही रात्री उशीरा पर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला.

शोध सुरू असताना एका ग्रामस्थाला अरुण हा डोंगराच्या दिशेने जाताना दिसल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.त्यावरून कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला.अखेर गावालगतच्या शिवारातील शिवाऱ्या डोंगरावर दोघेही आढळून आले. त्यांची स्थिती पाहून तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेची माहिती मृत तरुणीचे वडील अभिमन काशीराम बहिरम यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आय.जी.शिरसाठ पुढील तपास करीत आहेत.

घटनेमागील कारण गुलदस्त्यात

दोघांनी एकाच वेळी जीवन संपविण्याचा निर्णय का घेतला, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र,या चर्चाना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून तपासाअंतीच त्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT