साक्रीत बनावट दारूचा साठा जप्त 
धुळे

Dhule Crime : साक्रीत बनावट दारूचा साठा जप्त; पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बसरावळ गावाच्या शिवारात पिंपळनेर पोलिसांनी छापा टाकून बनावट दारूचा साठा जप्त केला. घरासमोर उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनातून ही बनावट दारू हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी वाहनासह तब्बल ८ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून एकावर गुन्हा दाखल केला.

साक्री तालुक्यातील बसरावळ गावालगत असलेल्या एका शेतात बनावट दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी टाकला.त्यावेळी शेतात असलेल्या घरासमोर (एम.एच ४८ सी.बी २४७) या क्रमांकाचे पिकअप वाहन दिसून आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. वाहनात विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ४ लाख ३२ हजाराची दारू व ४ लाख ५० हजाराची पिकअप असा एकूण ८ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमोश छगन ठिगळे (रा. शेंड्यावड पो. उमरपाटा ता. साक्री) याच्याविरोधात पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT